न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ मे २०२३) :- वॉटसअपव्दारे फिर्यादीला संपर्क केला. आरोपी व्यक्तीने फिर्यादीला काम देतो असे सांगुन, फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीला वेळोवेळी लिंक पाठवून अधिक पैसे / बोनस देण्याचे अमिष दाखवले.
फिर्यादीला वेगवेगळया बँकेमध्ये पैसे भरण्यास सांगुन एकुण २४,३८,००० रक्कमेची आर्थिक फसवणुक केली. ही घटना (दि २) ते (दि. ५) च्या दरम्यान काटे वस्ती, पुनावळे येथे घडला.
महीला फिर्यादीने आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. रावेत पोलिसांनी २०७/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ४२०,४०६. माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (सी) (डी) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















