न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० मे २०२३) :- जागेचे ठरल्याप्रमाणे ७,२६,००० रूपये फिर्यादीने आरोपीला दिले. असे असताना देखील आरोपी यांनी फिर्यादीला फसवले. फिर्यादीने दिलेले पैसे मुळ मालकास न देता ते पैसे स्वतःकडे ठेवुन घेवुन फिर्यादीची फसवणुक केली आहे.
ही घटना (दि.२२/०१/२०१७ ते दि. १६/०१/२०२३) पर्यंत वेळोवेळी शिरगाव ता. मावळ, जि. पुणे येथे घडली.
फिर्यादी दशरथ सत्यप्पा बनसोडे (रा. नखातेवस्ती, रहाटणी) यांनी आरोपी अमित अशोक ठोकळे (रा. शिरगाव), शैलेश रमेश देशमुख (अमरावती) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी १२६/२०२३ भा.दं.वि कलम ४२० नुसार गुन्हा दाखल केला आहे.
















