न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- पांढऱ्या रंगाची टाटा जेस्ट गाडी आरोपी चालकाने भरधाव वेगात बस स्टॉपमध्ये घुसविली. निष्काळजीपणे स्वत:सह इतरांच्या जिवीतास धोका उत्पन्न केला. सार्वजनिक मालमत्तचे नुकसान केले.
हा प्रकार (दि. १४) रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास बालाजी मंदीर, बसस्टॉप, वडमुखवाडी, च-होली येथील बीआरटी रोडवर घडला. फिर्यादी बाळासाहेब कांताराम पठारे (रा. च-होली) यांनी आरोपी विशाल शिवकांत भालके (ड्रायव्हर, रा. खराडी, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी २१३/२०२३भा.दं.वि. कलम २७९, ४२७, सार्वजनिक संपत्तीस हानी प्रतिबंध अधिनियम कलम ३ (२) (ड) व मोटर वाहन कायदा कलम १८४,१९८ अन्वये चालक आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
















