न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मे २०२३) :- मुलगा आणि पत्नीला भेटण्यासाठी फिर्यादी हे त्यांच्या पत्नीच्या भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी फिर्यादीचा मेव्हणा याने फिर्यादीला वाईटवाईट शिवीगाळी करून फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच सह आरोपीने लाकडी दांडक्याने डोक्यात मारुन त्यांना जखमी केले. तसेच मोठा मेव्हणा सह आरोपी यानेही लाकडी काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर, पाठीवर, पायावर मारहाण करुन त्यांना जखमी केले. तसेच फिर्यादी यांची पत्नी सह आरोपी हिनेही दगड विटांनी त्यांना मारहाण केली. फिर्यादी यांचा मुलगा हा भांडणे साडविण्यासाठी पुढे आला असता त्यालाही हाताने मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १३) रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १.३० च्या दरम्यान पाटीलनगर, चिखली येथे घडला.
फिर्यादी अमोल सुरेश कागे (रा. चिखली) यांनी आरोपी मेव्हणा लक्ष्मण दुधभाते, मावस मेव्हण विशाल बनसोडे, मेव्हणा राम दुधभाते यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी आरोपींवर ३२० / २०२३ भादवी कलम ३२४, ३२३, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















