न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयाच्या अतिक्रमण पथकाकडून गट क्र. ७७१ मधील कुदळवाडी चिखली रोड, कुदळवाडी नायरा पेट्रोल पंपासमोरील सुमारे ४७,५०० चौ.फुट अनधिकृत इंडस्ट्रीएल ६ पत्राशेडवर अतिक्रमण निष्कासनाची आज कारवाई करण्यात आली.
ही कारवाई सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, उप अभियंता सुर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत पाटिल, प्रसाद आल्हाट, प्रियंका म्हस्के, केतकी कुलकर्णी व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक योगेश शेवलकर व मनपा कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बल, महाराष्ट्र पोलिस, अग्रिशमन दल (चिखली) यांच्या पथकाने केली.
दररोज शहराच्या विविध भागात अतिक्रमण कारवाई केली जात आहे. नागरिकांनी रस्त्यावर अनधिकृत टप-या व पत्राशेड उभारु नये. तसेच फुटपाथ स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करावे. कारवाई केलेल्या ठिकाणी परवानगी घेतल्याशिवाय अनधिकृत पत्राशेड, बांधकाम करु नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत..