न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- मावळ तालुक्यातील बेबड ओव्हाळ येथील गट नंबर १९६ येथील ५ एकर मिळकत वनीकरण विभागात मोडते. त्या मिळकतीचे प्लॉटींग होत नाही, याबाबत आरोपीला माहिती असूनसुध्दा त्या मिळकती मधील २५ गुंठे जागेचा आरोपीने सन २०१३ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान फिर्यादीशी व्यवहार केला. त्याचा मोबदला म्हणून २५ लाख रुपये रक्कम फिर्यादीकडून घेतली. त्या जागेचे फिर्यादीचे नावाने खरेदीखत करून न देता, तसेच फिर्यादी कडुन घेतलेले २५ लाख रुपये फिर्यादीस परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणुक केली.
खरेदीखत करायचे असल्यास आणखीन ७० लाख रुपयांची खंडणी मागुन, पैसे न दिल्यास अथवा पोलीसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली असून ५ लाख रुपये खंडणी घेतली आहे, असं फिर्यादीत म्हटलं आहे.
फिर्यादी रविंद्र शिवाजीराव देशमुख (रा. वडगाव बुद्रुक, ता हवेली जि.पुणे) यांनी आरोपी प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (रा. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. शिरगाव पोलिसांनी १३६/२०२३ भादवि कलम ४०६,४२०,३८६, २८७ नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.