- विना हेल्मेट वाहनचालकांना कारवाईचा इशारा….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- पिंपरी-चिंचवड वाहतुक शाखेच्या वतीने शहरात रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेलमेट सक्तीबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली.
शहरातील महत्वाच्या चौकात विशेषतः गर्दीच्या ठिकाणी रस्ते अपघातात मृत्यु होणा-यांमध्ये दुचाकीस्वारांचे प्रमाण अधिक आहे. त्यातही हेल्मेट अभावी डोक्याला गंभीर दुखापत होवुन दगावणा-यांची संख्या अधिक आहे.
मोटार वाहन कायद्यानुसार व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार देशात कुठेही सार्वजनिक ठिकाणी दुचाकी चालवणा-या तसेच पाठीमागे बसलेल्या व्यक्तीला हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. तरी देखील दुचाकी वाहन चालकांकडुन हेल्मेटचा वापर केला जात नाही.
त्या अनुषंगाने हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती मोहिम राबविण्यात आली. दि.०८/०५/२०२३ ते दि.१०/०५/२०२३ या कालावधीत चिंचवड वाहतुक विभागाच्या हद्दीमध्ये दिनांक ०८/०५/२०२३ रोजी १०.३० ते १२.३० गुरुव्दारा चौक, दिनांक ०९/०५/२००३ रोजी १०.३० ते १२.३० वा. रिव्हर व्हयु चौक, १०/०५/२०२३ रोजी १०.३० ते १२.३० वा. एसकेएफ रोड दळवीनगर इत्यादी ठिकाणी रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने मोहिम राबवुन त्या ठिकाणी हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करण्यात आली आहे.
यावेळी मोटार वाहन कायद्यानुसार व सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार हेल्मेट सक्ती बाबतचे फ्लेक्स बनवुन तसेच हेल्मेट व विना हेल्मेट वाहनाचे झालेल्या अपघाताचे वास्तव दाखविणाऱ्या चित्राचे फ्लेक्स तयार करुन सार्वजनीक ठिकाणी लावण्यात आले होते. यावेळी विना हेलमेट वाहन चालक यांना हेल्मेट सक्तीबाबतचे निर्देश तसेच हेल्मेट व विना हेल्मेट वाहनांचे झालेले अपघाताचे वास्तव दाखवीणारे चित्राचे फ्लेक्स दाखवून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार, असा इशारा दिला. तसेच हेल्मेटचा वापर करणारे वाहन चालक यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करुन जनतेला रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने हेलमेट वापरा बाबत महत्व पटवून देण्यात आले.
या जनजागृती मोहिमेच्या वेळी वाहतुक पोलीस तसेच परिवहन विभागाकडून अनुश्री केंद्रे मोटार वाहन निरीक्षक, सोनाली मोटे सहा. मोटार वाहन निरीक्षक, सुवर्णमाला लिंगरे सहा. मोटार वाहन निरीक्षक, राजेंद्र पाटील सेवानिवृत्त सहा. मोटार वाहन परिवहन अधिकारी, नामदेव ढाके माजी नगरसेवक, दत्तात्रय चिचवडे समाजसेवक, खंडुशेठ चिंचवडे समाजसेवक, महेश कंद समाजसेवक, सुनिल चौधरी समाजसेवक, वसंत ढवळे शांतता कमिटी सदस्य, नंदकुमार पतकी शांतता कमिटी सदस्य, निर्मला जगताप महिला दक्षता कमिटी सदस्य, निरजा देशपांडे महिला दक्षता कमिटी सदस्य, ऊर्मिला चौरे महिला दक्षता कमिटी सदस्य, कांचन राजकर महिला दक्षता कमिटी सदस्य, अनिता धाक्रस महिला दक्षता कमिटी सदस्य, जयश्री विनकर महिला दक्षता कमिटी सदस्य, तसेच चिचवड वाहतुक विभागातील पोलीस अंमलदार व वार्डन असे उपस्थित होते.
या रस्ता सुरक्षेच्या दृष्टिने हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती मोहिम पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त विवेक पाटील, सहा. पोलीस आयुक्त सतिश माने यांच्या मार्गदर्शना खाली वपोनि अजय जोगदंड, पोहवा. ३६५ दत्तात्रय माळवदकर, पोहवा. ८५१ सरोदे, मपोहवा. ९७३ जगताप, मपोना. १६४२ काळे, मपोना. १७८७ बो-हाडे, पोशि. २६८८ शिंदे, पोशि. २६३४ घोडके, पोशि. २८९ उबाळे, पोशि. २५३१ सोनकांबळे, तसेच वाहतुक वार्डन दशरथ खरटमल, अनिल कांबळे, राजेंद्र पाटील, चेतन कावळे, महेंद्र खळे, राजु नवले, अक्षय कांबळे, अनिल शहा, गणेश पवार, रमेश चिलवंत यांनी हेल्मेट जनजागृती मोहिम राबवली.
यापुढे देखील वाहतुक शाखेकडील विशेष मोहिमे दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करुन व जास्तीत जास्त वाहनांची तपासणी करुन त्यांच्यावर ई-चलन कारवाई केलेली असेल तर दंड वसुली केली जाणार आहे. तसेच वाहतुक शाखेकडुन सर्व वाहन चालकांना हेल्मेटचा वापर करुन मोटार वाहन कायद्याचे पालन करणयाबाबत आवाहन करण्यात आले आहे.












