न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- मावळ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तळेगाव दाभाडे या संस्थेचे सन २०१६ ते २०१९ या सालचे वार्षिक वैधानिक लेखापरिक्षण झाले आहे.
या लेखापरिक्षाणा दरम्यान संस्थेचे तत्कालीन आरोपी व्यवस्थापक व आरोपी वरिष्ठ लिपीक/ संगणक ऑपरेटर या दोघींनी आपसात संगणमत करून संस्थेच्या खातेधारकांच्या जमा झालेल्या रक्कमा वेगवेगळया ११ दैनिक बचत प्रतिनिधीच्या खात्यांवरून एकण ७२,३९,१९३ व रोख रक्कमेतील ९,८४,२६६ रू. याप्रमाणे एकूण ८२,२३,४५९ रूपयांचा अपहार / गैरव्यवहार केला आहे, तसे निश्पन्न झाले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार सन २०१६ ते २०१९ दरम्यान घडला. फिर्यादी रोहीत राजेद्र पाटील (प्रमाणित लेखापरिक्षक, धनकवडी, पुणे) यांनी दोन महिला आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे. तळेगाव दाभाडे पोलिसांनी २४३/२०२३ भादवि कलम ४२०, ४०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.