न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ मे २०२३) :- अज्ञात आरोपीने फिर्यादीला वॉटसअप तसेच टेलीग्राम या अॅपवरुन मेसेज केला. क्रिप्टो करन्सीमध्ये शॉर्ट प्रिपेड प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास अधिक फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखविले.
फिर्यादीचा विश्वास संपादन करुन फिर्यादीकडुन ट्रेड चुकल्याचे सांगुन दंड, इनकम टॅक्स अशी वेगवेगळी कारणे सांगुन एकुण २७,००,५०० रक्कम घेवुन फिर्यादीचे पैसे परत न देता फिर्यादी यांची फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. १८/०३/२०२३ ते २९/०३/२०२३) दरम्यान बो-होडवाडी, मोशी येथे घडली. महिला फिर्यादीने मो.क. +६२८५७-६०१३-४२८० या नंबरवरुन वॉटसअपव्दारे तसेच टेलीग्राम अॅपवरुन अर्पिता या नावाने मेसेज करणारी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २०८/२०२३ भादवि कलम ४१९,४२० सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ सी.६६ डी नुसार गुन्हा दाखल केला आहे.