- दलालांवर गुन्हे शाखेकडून कारवाई; दोन पिडीत महिलांची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- स्पा च्या नावाखाली काही दलाल स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी अवैधरित्या मुलींना जास्त पैशाचे अमिष दाखवून वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडतात, अशी गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष विभाग, गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्राप्त झाली.
पोलिसांनी दलाल व्यक्तींची गोपनीय माहिती काढून, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, गुन्हे शाखे कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी (दि. १८) रोजी सापळा रचून बनावट ग्राहकाकरवी वेश्यागमनासाठी मुलींबाबत विचारणा केली. दलालाने सांगवी परिसरातील JASMINE FAMILY SPA कृष्णानगर, नवी सांगवी येथील माहिती दिली. त्यानंतर अचानक छापा मारून आरोपी कुणाल राममुर्ती रेड्डी (वय ३९ वर्षे, रा. बोपोडी), पाहिजे आरोपी महिला यांच्या ताब्यातून दोन मुलींची वेश्याव्यवसायातुन सुटका केली. आरोपीस ताब्यात घेवून सांगवी पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २२९/२०२३ भादवि कलम ३७० (३) ३४ सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५,७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सांगवी पोलीस स्टेशन कडील पोलीस अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे), स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे), डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षातील पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोउपनि प्रदिपसिंग सिसोदे, विजय कांबळे, पोलीस अमलदार, सुनिल शिरसाट, सुधा टोके, मारुती करचुंडे, गणेश कारोटे, सागर सुर्यवंशी, वैष्णवी गावडे, संगीता जाधव, सोनाली माने यांनी केली आहे.