- भोसरी पोलिसांकडून कोयत्यासह एकाला अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- सोशल मिडीया सेलची पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात स्थापना करण्यात आली आहे. त्यावरून भोसरी पोलीस हे गुन्हेगारांच्या सोशल मिडीया अकाउंटची पाहणी करीत होते. त्यावेळी पोलिसांना अभिलेखावरील गुन्हेगारांनी पूर्व वैमनस्यातुन इन्स्टाग्राम स्टेटसच्या माध्यमातुन विरोधी गटातील गुन्हेगारांना शिवीगाळ व खुन्नस देणारे संदेश पाठविल्याचे दिसुन आले. त्याबाबत अधिक चौकशी केली असता स्टेटस ठेवणाऱ्यांच्या इन्स्टाग्राम ग्रुपमधील काही सदस्य रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
दोन्ही गटांची गुन्हेगारी पार्श्वभुमी पाहता त्यांच्या हातुन एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडण्याची शक्यता असल्याने भोसरी पोलीस स्टेशन तपास पथकाचे अधिकारी व अंमलदारांनी सदस्यांची तपासणी सुरू केली. तपासणी दरम्यान आरोपी शफिक सुलतान शेख (वय-२३ वर्षे, रा. गोडावुन चौक, भोसरी), फिरस्ता (लातुर) याला (दि. १८) रोजी रात्री ९.०० च्या सुमारास मोहननगर, भोसरी येथून ताब्यात घेतले. त्याच्याजवळ धारदार लोखंडी कोयता मिळुन आला. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासा दरम्यान त्यांच्या गटातील सदस्यांचे सद्गुरूनगर, भोसरी येथील गुन्हेगारांशी वाद झाल्याने त्या वादाचा बदला घेण्यासाठी त्याने कोयता बाळगल्याचे तपासात सांगितले. आरोपीच्या साथीदारांविरुध्द भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन व पिंपरी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असुन भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परिमंडळ विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक कल्याण घाडगे, पोलीस उप-निरीक्षक मुकेश मोहारे, तसेच सहा. पोलीस फौजदार राकेश बोयणे, पोलीस अमलदार सचिन गारडे, नवनाथ पोटे, धोंडीराम केंद्रे, सागर जाधव, तुषार वराडे, आशिष गोपी, प्रतिमा मुळे, संतोष महाडीक, स्वामी नरवडे, अनिकेत पाटोळे, ज्ञानेश्वर साळवे यांनी केली आहे.