न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- थेरगाव येथील वनदेवनगरमध्ये काळेवाडीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे ओपन मॅनहोल आहे. गुरुवारी रात्री एक व्यक्ती त्यात पडून जखमी झाला आहे.
महापालिकेने गंभीर दुर्घटना घडण्याची वाट न पाहता तातडीने त्यावर झाकण बसविण्यात यावे, अशी मागणी अॅड. सचिन गोडांबे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत त्यांनी सारथीवर ऑनलाईन तक्रार करूनही कार्यवाही झालेली नाही. त्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असे त्यांनी म्हटले आहे.











