न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ मे २०२३) :- भुजबळ चौक ते सयाजी अंडरपास या सर्व्हिस रस्त्यावर पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सेवा रस्त्यावर पाणी जमा होवुन वाहन चालकांना अडचणी निर्माण होतात.
त्यामुळे या ठिकाणी पावसाळ्याच्या पाण्याचा निचरासंबंधी काम करण्यात येणार आहे. त्यामुळे (दि. २१ पासुन ३१ मे) पर्यंत वाहतुक इतरत्र वळविण्यात आली आहे. तसा आदेश वाहतूक विभागाने निर्गमित केला आहे.
वाहतुकीत बदल पुढीलप्रमाणे :-
- सुर्या अंडरपास कडुन सर्व्हिस रोडने वाकड नाका मार्गे सयाजी अंडरपासकडे जाणारी सर्व प्रकारची वाहने ही इंडियन ऑईल चौक, कस्तुरी चौक, भुमकर चौक मार्गे ईच्छीत स्थळी जातील.
- इंडियन ऑईल चौकाकडुन सर्व्हिस रोडने वाकड नाका मार्गे सयाजी अंडरपास व वाकडकडे जाणारी वाहतूक सावतामाळी मंदिर येथुन वाकड फ्लायओव्हर ब्रिजवरून ईच्छीत स्थळी जातील.
- इंडियन ऑईल चौकाकडुन सर्व्हिस रोडने वाकड़ नाका सयाजी अंडरपास यु टर्न-वाकड नाका सातारा लेन मार्गे हायवे रोडला जाणारी वाहतुक ही वाकड फ्लायओव्हर ब्रिजवरुन वाकडगाव युटर्न घेवून वाकड नाका सातारा लेन मार्गे हायचे रोडने इच्छित स्थळी जातील.
- इंडीयन ऑईल चौक येथुन वाकड नाका मार्गे सर्व्हिस रोडने सयाजी अंडरपास मार्गे हायवेला जाणारी वाहने ही वरील मार्गे न जाता ती कस्तुरी चौक-विनोदे वस्ती- भुमकर चौक मार्गे इच्छीत स्थळी जातील.
नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वरील प्रमाणे वाहतुक बदलाबाबत वॉर्डन व वाहतुक कर्मचारी यांना सहकार्य करावे, असे अवाहन पिंपरी चिंचवड शहर, वाहतुक शाखा यांनी केले आहे.











