न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मे २०२३) :- कोविड १९ मध्ये दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचे समाज विकास विभागाकडून समाज संघटक यांच्यामार्फत सर्वेक्षण करण्यात आले होते. अशा मुलांना उप आयुक्त अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वसतिगृहामध्ये दाखल करण्यात आलेले होते.
यामधील अंजली संजय मोरे, गौतम संजय मोरे,आणि अभिषेक संजय मोरे या तिळ्या मुलांचे शिक्षण व्यवस्थित सुरू आहे. या भावंडानी महापालिकेचे आभार व्यक्त करण्यासाठी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली.
यावेळी उप आयुक्त अजय चारठाणकर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच समूह संघटक वैशाली खरात उपस्थित होत्या.