न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२३) :- चिखली परिसरात पिस्तुलातून गोळीबार झाल्याची माहिती मिळतेय. दुचाकीवरून दोघे आले त्यांनी एकावर गोळीबार केला आणि पसार झाले.
हा प्रकार दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे. गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव सोन्या तापकीर आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर हाती आलेल्या वृतानुसार गोळीबारात जखमी झालेल्या सोन्या तापकीरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.
हल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. चिखली पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.