- चिखली पाटीलनगर मधील त्याचे वाढते प्रस्थही कारणीभूत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२३) :- नवरात्र उत्सवा दरम्यान विकास साने यांनी पाटीलनगर चिखली येथील मैदानावर आयोजित केलेल्या दांडीया कार्यक्रमाच्या वेळी आरोपी आणि फिर्यादीच्या भाच्याचे आरोपी व त्याच्या इतर साथीदारांसोबत भांडण झाले होते. तसेच फिर्यादीच्या भाच्याची चिखली परिसरात वाढत चाललेली प्रतिष्ठा याचा राग मनात धरून त्याच्यावर आरोपींनी गोळया झाडुन त्याचा खुन केला आहे.
ही घटना (दि. २२) रोजी दुपारी १.३० ते १.४५ च्या दरम्यान चिखलीगांव कमान येथील गणपती मंदीराशेजारी, चिखली येथे सार्वजनीक रोडवर घडला. कृष्णा ऊर्फ सोन्या हरिभाऊ तापकिर (वय २१ वर्षे, रा महादेवनगर, चिखली) असे खुन झालेल्या तरुणाचे आहे.
फिर्यादी राजेंद्र कैलास कार्ले (रा. चांदुस, ता. खेड, जिल्हा पुणे) यांनी आरोपी सौरभ ऊर्फ सोन्या पानसरे (पुर्ण नांव माहित नाही), सिध्दार्थ कांबळे (पुर्ण नांव माहित नाही, दोघेही रा. फलकेवस्ती, मोईगांव ता. खेड), इतर साथीदार यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ३४६/२०२३ भादवि कलम ३०२ १२० (ब), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५) (२७) महाराष्ट्र पोलीस अधिनिय १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.