न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मे २०२३) :- शेजारील सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपीने फिर्यादी महिलेला त्यांचा मोबाईल नंबर मागितला. फिर्यादीने आरोपीला मोबाईल नंबर दिला नाही.
या कारणावरून आरोपीने हातात लपवुन आणलेला सिमेंटचा ब्लॉक फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजुस जोरात मारुन गंभीर जखमी केले. शिवीगाळ व बघुन घेण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना (दि. २१) रोजी रात्री ९.०० च्या सुमारास पत्राशेड, पाणीफिल्टर शेजारी, चिंचवड, लिंक रोड येथे घडला.
महीला फिर्यादी यांनी आरोपी शारुख हुसेन शेख (लिंकरोड पत्राशेड, चिंचवड) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिंचवड पोलिसांनी २२९/२०२३ भादंवि कलम ३२६,५०४ ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.