न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- आद्या प्रॉपटीज कंपनीत फिर्यादी नोकरी करत आहेत. सन २०१३ मध्ये गट ११९, १२०, १२१, १२२ मधील जमीन ही आरोपींकडून विकसन करण्यासाठी योग्य त्या कागदपत्रासह व करारातील तरतुदी प्रमाणे कंपनीच्या ताब्यात घेण्यात आली होती. विकसन करण्यासाठी लागणारी परवानगी व मंजुरीसाठी वेळ लागत होता. त्याबाबत नोंदणीकृत करारानुसार विविध कारणास्तव झालेल्या विलंबामुळे फिर्यादीच्या कंपनीच्या मालकाने या जागेचे मालक व त्याचे वारसदार त्यांना वेळोवेळी विलंब दंड रकमेचे वेगवेगळे धनादेश दिले होते. ते यापुढे सुध्दा देण्यास तयार आहेत. मात्र, आरोपी यांनी फिर्यादीच्या मालकाकडे चालु बांधकामातील अतिरिक्त क्षेत्राची मागणी केली. ती मागणी व्यावहारीक नसल्याने फिर्यादीच्या मालकाने ती आमन्य केली.
तेव्हा यातील आरोपींनी फिर्यादी यांना ‘तुमचा नकार तुम्हाला अवघड जाईल’, अशा भाषेत धमकी दिली. आरोपी हे सदरचे बांधकाम बंद होण्यासाठी फिर्यादीच्या कामगारांना शिवीगाळ व धमक्या देत होता. त्यानंतर यातील सह आरोपी यांनी फिर्यादीच्या ताब्यातील मिळकतीमध्ये बेकायदेशीर प्रवेश केला. कंपनीची बदनामी करण्याच्या उद्देशाने त्यांचा बेकायदेशीर सुचना फलक लावला. त्यामध्ये विकसन करार करणा-या इसमांपैकी तिन इसमांचे निधन झाले असून विकसन कराराची वैधता संपुष्टता आली आहे. करार रद्द होण्यासाठी दिवाणी न्याया, वरिष्ठ स्तर, पुणे यांच्याकडे सिव्हील सुट दाखल केला आहे. त्यामुळे मिळकतीबाबत कोणताही व्यवहार करु नये, असा मजकुर फलकावर होता.
तसेच यातील आरोपींनी फिर्यादी यांच्या कार्यालयात येवून कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयास कुलुप लावले. त्यानंतर फिर्यादी यांनी कामगाराकरवी आरोपी यांनी लावलेला फलक काढला. कार्यालयाचे कुलुप उघडले. काही वेळाने यातील आरोपी यांनी सदर ठिकाणी फिर्यादीच्या कामगारांना शिवीगाळ करुन ‘आम्ही लावलेला फलक कोणी काढला, त्याने ते फलक परत लावावा, नाहीतर त्यांना त्यात गाडून टाकेल. तसेच यापुढे येथे काम करायचे नाही. नाहीतर तुमचे हातपाय तोडुन तुकडे तुकडे करून मुडदे पाडु, अशी धमकी दिली. डांबुन ठेवले व फिर्यादीच्या कामगाराला मारहाण करुन दुखापत केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. १७) रोजी दुपारी २.३० च्या सुमारास व संध्याकाळी ७.३० च्या दरम्यान तसेच गट ११९ आद्यराधा कृष्णा रेसीडेन्सी, चिखली येथे घडली. फिर्यादी प्रशांत जालींदर हिंगे (रा. चिखली) यांनी आरोपी अनिरुध्द राजेंद्र जाधव, प्रणव वासुदेव जाधव, मयुर संजय जाधव, गणेश चांगदेव जाधव, महीला आरोपी, अनिकेत अरुण जाधव, कुमार राजेंद्र जाधव (रा. सर्वजण जाधववाडी, चिखली) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ३४७/२०२३ भादवि कलम ४४७, ४४८, १२३, २४१, १४९, १४३, १४३, १४७, १४९, ५०४ ५०६ (२), ५०० प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.