न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे, शिरगांवच्या बाजुला होर्डींग बॅनरच्या शेजारी आरोपीने गावठी हातभट्टची दारु तयार करण्यासाठी ६,४०,००० रुपये किंमतीचे मिश्रीत कच्चे रसायन गुळ ८००० लिटर, ३६,७५० रुपयांची हातभट्टीची तयार दारु २४५ लिटर, ४ पत्र्याची टाकी किंमत ८०००, एक अॅल्युमिनीयमचे भांडे १००० असे एकुण ६,८५,७५० रुपये किंमतीचे प्रोव्हीशन माल बेकायदेशिररित्या जवळ बाळगला.
हातभट्टीचे गुळ मिश्रीत कच्च्या रसायनापासून हातभट्टीची दारू तयार करीत असताना पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांची चाहुल लागताच आरोपी पळुन गेला आहे.
ही कारवाई (दि. २२) रोजी रात्री ९.३० वा. च्या सुमारास पोलिसांनी केली. शिरगाव पोलिसांनी रुपेश ईश्वर पवार (रा. कंजारभट वस्ती, शिरगांव) याच्या विरोधात १४६ / २०२३ महाराष्ट्र दारुबंदी अधि कलम ६५ (क) (फ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.