न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे शहरात आयोजन केले होते. आयोजकावर भोसरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गौतमी पाटील चर्चेत आली आहे.
कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित लांडे यांचा सोमवारी वाढदिवस होता. यानिमित्त त्यांनी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रमाचे जाहीर आयोजन केले होते.
सोमवारी गौतमी पाटीलने काही भन्नाट गीतांवर ताल धरून दिलखेच अदांवर तरुण- तरुणींना घायाळ केलं. असं असताना आता कार्यक्रम होऊन गेल्यावर आयोजक म्हणजेच बर्थडे बॉयवर मात्र गुन्हा दाखल झाला आहे.