न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड शहरातील पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करणे आवश्यक आहे. यासाठी महानगरपालिकेच्या उद्यान, वृक्षसंवर्धन विभागाने व उदयन शामिनी फेलोशिप प्रोग्राम यांच्या वतीने उद्या (दि.२५) सीड बॉल्स बनविणे कार्यशाळा सकाळी १० ते १२ या वेळेत गुलाब पुष्प उद्यान, नेहरूनगर येथे आयोजित केली आहे.
शहरातील नागरीकांमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीकोनातून जास्तीत जास्त देशी वृक्षांची लागवड करून वृक्षारोपणाचे महत्व याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
शालेय विड्यार्थ्यामध्ये पर्यावरणाचे तसेच माझी वसुंधरेचे महत्व व वृक्षारोपणाचे महत्व वृध्दिगंत करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे व वृक्षारोपण करून घेणे. त्याच प्रमाणे विद्याथांना पर्यावरणाविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या कार्यशाळेत शहरातील सर्व नागरीक, जेष्ठ नागरीक संघ, विविध सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी, शालेय विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.