न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- दुचाकीवर येऊन मुलींच्या नावाने गल्लीमध्ये आरडाओरडा करणाऱ्या आरोपींना फिर्यादी महिलेने जाब विचारला. याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यांचे दीर हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांनाही धमकावून लाकडी दांडा व कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातील जबरदस्तीने १५०० रुपये काढून घेतले. जमलेल्या लोकांना शिवीगाळ करून समोर आला तर जीवानिशी ठार मारेल, असे धमकावून दहशत निर्माण केली. दरम्यान फिर्यादीच्या गल्लीतील मुलगी व आरोपी यांची मैत्री आहे. दुसऱ्या आरोपीची मैत्रीण देखील त्याच गल्लीत राहते, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हि घटना (दि. २४) रोजी दुपारी ४.०० च्या सुमारास गोसावी वस्ती, टेल्को कॉलनीजवळ, तळेगाव दाभाडे येथे घडली. महीला फिर्यादी यांनी आरोपी किटक उर्फ जय भालेराव (रा. तळेगाव दाभाडे), वैभव विटे (रा. रेल्वे स्टेशन जवळ, तळेगाव दाभाडे), आर्यन उर्फ छोटा बांडी, अनिल गरुड, विशाल गुंजाळ (रा. वराळे गाव), प्रदीप वाघमारे (रा. वडगाव), दादया वाघमारे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी २४७/२०२३ भादवि कलम ३९५,३५४ब, फौजदारी ३७ (१) (३) १३५ प्रमाणे सुधारणा अधि ७, आर्म अॅक्ट ४, २५ मपोका नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला असून तिघांना ताब्यात घेतले आहे.