न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- व्हॉटसअप व इंस्ट्राग्रामवर अश्लिल कमेन्टस केल्या. युटयुबला टॅग करुन युटयुबची लिंक व्हिडीओ टाकुन फिर्यादीची बदनामी केली. फिर्यादीचा मुलगा याचा इंस्टाग्राम अकाउंट व मुलीचा इंस्टाग्राम अकाउंट या दोन्ही आयडीवर फिर्यादी महिलेच्या नावाची भावपुर्ण श्रध्दांजलीची पोस्ट टाकली व फिर्यादी मृत आहे अशी खोटी अफवा पसरवली.
सामाजिक कार्य करीत असताना आरोपी ने फिर्यादीचा विविध सोशल मिडीयावर पाठलाग करुन त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे अश्लील मेसेजेस केले. आरोपीच्या आईचा ब्लाउज फाडला, साडी फाडली असे सर्व युटयुबवर टाकतो व तुला बघुन घेतो, अशी धमकी त्यांना दिली आहे.
ही घटना (दि. ३१/१/२०२३ ते दि. २३/५/२०२३ पर्यंत) फिर्यादीच्या मोबाईलवर च-होली बु. येथे घडली. महीला फिर्यादी यांनी आरोपी चेतन रोहित सिंग (रा. विश्रांतवाडी, पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २२४ / २०२३ भा.द.वि कलम ३५४(४), ५०६,५०९,५०० नुसार गुन्हा दाखल केला आहे.