न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- रेकॉर्डवरील गुन्हेगार सुनिल बाळासाहेब खेंगरे (वय-३८ वर्षे रा. साठे कॉलनी, चिंचवडेनगर, चिंचवड) व त्याचा साथीदार अभिजीत अशोक घेवारे (वय ३५ वर्षे काळेवाडी) यांना एस. के. वॉशिंग सेंटर समोर, मुंजोबा वसाहत, वाल्हेकरवाडी रोड, चिंचवडेनगर येथुन पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून १,२०,६०० रुपयांचे ३ देशी बनावटीचे पिस्टल व ३ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आले आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक आरोपी सुनिल बाळासाहेब खेंगरे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याच्या विरुध्द दुहेरी खुनाचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, डॉ. प्रशांत अमृतकर, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्याभार खंडणी विरोधी पथक, तसेच खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, सुनिल कानगुडे, किरण काटकर, व तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोहवा नागेश माळी यांच्या पथकाने केली आहे.


















