- बारा लाखांचे सोन्याचे दागीने जप्त; रहाटणीतील घरफोडीतही सहभाग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- उन्हाळयाच्या सुट्टीनिमीत्त पिंपरी चिंचवड परीसरातील असंख्य रहीवासी राहती घरे बंद करुन गावी जात असतात. त्यामुळे मोठया प्रमाणावार घरफोडीच्या गुन्हयामध्ये वाढ होते असते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना जास्तीत जास्त पोलीस अंमलदार नेमुन सतर्क पेट्रोलींग करण्याबाबत तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागास सक्त पेट्रोलींग करुन घरफोडीच्या गुन्हयांना आळा घालण्याबाबत आदेश दिले होते.
दरम्यान (दि. १७) रोजी ११.३० ते ५.१५ च्या दरम्यान सनं. २८/१ शिवराजनगर, रहाटणी येथे बंद घराचा कडी कोयंडा अज्ञात चोरटयाने तोडुन घरात प्रवेश करुन घरातील १० तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व रोख रक्कम असा ऐवज घरफोडी चोरी करुन नेला, असा गुन्हा रजि.नं. ४८२ / २०२३ भादविक ४५४,३८० अन्वये दाखल झाला होता.
त्या अनुषंगाने गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाकड पोलीस ठाणे यांनी तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण व तपास पथक अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून गुन्हे घडणारी वेळ व वारंवार गुन्हे घडणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक पेट्रोलींग करत सापळा कारवाई व वाकड पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळया ठिकाणी नाकाबंदी करुन गुन्हयांना आळा घालणे व आरोपींना पकडुन गुन्हे उघड करण्याबाबत सुचना दिल्या.
त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रीक व पांरपारीक पद्धतीने तपास सुरु केला. सपोनि संतोष पाटील व त्यांच्या सोबतच्या पोलीस स्टाफ पेट्रोलींग करीत जगताप डेअरी ब्रिजखाली बेवून थांबले असता त्यांना तेथे अॅक्टीव्हा मोपेडवरून एक फिकट निळ्या रंगाचा टि शर्ट घातलेला इसम येताना दिसला. हा इसम शिवराजनगर, रहाटणी येथे घडलेल्या घरफोडीतील संशयीत इसमासारखा वाटला. परंतु सदरचा इसम पोलीसांना पाहताच तेथून पळुन जाण्याचा प्रयत्न करताच त्याला ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारला.
त्याने आपले नाव सचिन भिमराव पाटील (वय ३२ वर्षे रा. भारत फोर्स कंपनीजवळ, साईपार्क, घोरपडी गाव, घोरपडी, पुणे) असे सांगीतले. त्या इसमास ताब्यात घेवुन त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला मागील बाजुस घराचा कडी कोयंडा तोडण्यासाठी वापरलेला एक स्टिलचा छोटा रॉड खोचलेला मिळुन आला. हा इसम हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी देखील ५ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास केला असता त्याने वाकड व चतुःश्रीगी भागातील बंद घर फोडुन घरफोडी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडुन ३ गुन्हे उघड करुन १२,२०,००० रुपये किंमतीचे २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने हस्तगत करण्यात आले असून तपास चालू आहे.
ही कारवाई विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, डॉ. संजय शिंदे सह पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, डॉ. काकासाहेब डोळे, पोलीस उप आयुक्त, परि-२, श्रीकांत डिसले, सहा. पोलीस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामचंद्र घाडगे पोलीस निरीक्षक गुन्हे-२, सपोनि संतोष पाटील, पोउपनि सचिन चव्हाण, सपोफो विभीषण कन्हेरकर, सपोफी बाबाजान इनामदार, सपोफी राजेंद्र काळे, पोहवा बंदु गिरे, पोहवा संतोष बर्गे, पोहवा. स्वप्निल खेतले, पोहवा. अतिश जाधव, पोहवा. प्रमोद कदम, पोना. अतिक शेख, पोना. विक्रांत चव्हाण, पोना प्रशांत गिलबीले, पोशि अजय फल्ले, पोशि तात्या शिंदे, पोशि, स्वप्निल लोखंडे, पोशि सौदागर लामतुरे, पोशि. विनायक घारगे, पोशि रमेश खेडकर, पोशि कोर्तेय खराडे, पोशि भास्कर भारती, तसेच परिमंडळ २ कडील पोशि पंडीत यांनी मिळून केली आहे.