न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मे २०२३) :- पिंपरी चिंचवड शहराचा बारावीचा निकाल ९४. ४४ टक्के लागला असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.२ टक्क्यांनी निकाल घटला आहे. यंदा ९७.७७ टक्के मुलांनी बाजी मारली आहे. बारावीचा निकाल आज गुरुवारी (दि. २५) ऑनलाइन जाहीर झाला आहे.
यंदा २३ शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. शहरातून १८ हजार ७६ विद्यार्थांनी नोंदणी केली होती. नऊ हजार ६०० मुले, तर ८ हजार ४७६ अशी संख्या होती. ९ हजार ५३८ मुले, तर ८ हजार ४३७ असे एकूण १७ हजार ९७५ विद्यार्थांनी परीक्षा दिली. त्यापैकी ८ हजार ८४९ मुले आणि ८ हजार १२७ मुली असे मिळून १६ हजार ९७६ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात ९७.७७ टक्के मुलांनी बाजी मारली आहे. ९६.३२ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.
निकाल पाहताच विद्यार्थ्यांनी जल्लोष सुरू केला. एकमेकांना शुभेच्छा देत यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले यश मित्र-मैत्रिणींबरोबर ‘सेलिब्रेट’ केले. कोणी पेढे वाटून, तर कोणी एकमेकांना हस्तांदोलन करून यशाच्या शुभेच्छा दिल्या. हसरे चेहरे आणि आनंदी चेहऱ्यांनी महाविद्यालयाचा परिसर फुलून गेला होता.