- माथेफिरूची तक्रारदारासह त्यांच्या पती अनं मुलांना मारहाण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जून २०२३) :- ‘माझ्या विरुध्द मंत्रालयात व महावितरण कंपनीत केलेली तक्रार मागे घे’, असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या नव-याला शिवीगाळ करुन पटटयाने मारहाण केली. फिर्यादी त्यांना सोडविण्यास गेल्या असता ‘तुम्हाला जिवंत सोडत नाही’ असे म्हणत फिर्यादी व फिर्यादी यांच्या मुलांना देखील आरोपीने पटयाने मारहान करुन फिर्यादीचा गळा आवळला.
तसेच जवळच पडलेली काच घेवुन फिर्यादीच्या डाव्या हाताच्या मनगटाची शिर कापण्याचा प्रयत्न केला, तसेच फिर्यादीच्या छातीला हात लावुन ढकलले. आरोपीने फिर्यादीच्या मनास लज्जा उत्पन होईल असे वर्तन केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २) रोजी सायंकाळी ४.०० च्या सुमारास दत्तनगर बसस्टॉप जवळ, दिघी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी कुनाल सोपान गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दिघी पोलिसांनी २४३ / २०२३ भा. द. वि कलम ३२४, ३५४ (४) ३२३, ५०४, ५०६ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.












