न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- रेस्टॉरंट बार पहाटेपर्यंत चालू ठेवला. तसेच आरोपींनी पेटत्या शेगडीच्या बाजुलाच घरगुती गॅस टाक्या ठेवल्या होत्या. सबंधित वेळी हॉटेलमध्ये दोघे जेवण करीत होते तर, दोघे जेवायला आले होते. आरोपी हॉटेल मालकाने संगनमताने तिथे काम करणा-या लोकांची, स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी न घेता, गॅस हा ज्वालाग्राही पदार्थ आहे, हे माहित असतांना देखिल त्याच्या बाजुलाच पेटली शेगडी ठेवून, त्यामुळे आग निर्माण होऊन त्या आगीपासून धोका संभव आहे, याची जाणीव असुनदेखिल ज्वालाग्राही पदार्थाबाबत हयगयीचे वर्तन केले.
तसेच हॉटेल शर्तीपेक्षा जास्त वेळ उघडे ठेऊन त्यातील खादय पदार्थाची विक्री केली. हा प्रकार (दि ४) रोजी पहाटे २.३० वाजता हॉटेल कुणाल रेस्टॉरंट बार, आर्य समाज चौक जवळ, पिंपरी रेल्वे स्टेशन बाजुला, पिंपरी येथे घडला.
पिंपरी पोलिसांनी ६०५ / २०२३ भा.द.वि कलम २८५, ३४ व मुंबई पोलीस अॅक्ट कलम ३३ अ आर डब्लू १३१ नुसार सनी परमानंद सुखेजा, सरफराज महमंद अल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












