न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- चिखली कमानीजवळ गोळया झाडुन फिर्यादी यांचा मुलगा सोन्या ऊर्फ कृष्णा हरिभाउ तापकिर याचा (दि. २२/०५/२०२३) रोजी खुन करण्यात आला आहे.
याप्रकरणी फिर्यादीच्या भावाने फिर्याद दिली आहे. चिखली पोलीस स्टेशनमध्ये गु.र ३४६/२०२३ भादवी कलम ३०२ वगैरे प्रमाणे सोन्या ऊर्फ सौरभ पानसरे, सिध्दार्थ कांबळे, करण रोकडे व त्याचे साथिदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास चालू आहे.
दरम्यान फिर्यादी हे त्यांच्या मुली व त्यांच्या शेजारी राहणारा पुतण्या मिलिंद दत्तात्रय तापकिर, इतर नातेवाईक यांच्या सोबत घरात बसल्या असता दोघी महिला आरोपी व विधीसंघर्षग्रस्त मुलगी हे फिर्यादीच्या घरात घसुन गृहअतिक्रमण केले. त्यातील आरोपीने फिर्यादीला धमकी दिली. “तुमच्या मुलाच्या खुनाच्या गुन्हयात करण रोकडे व त्याच्या साथीदारांना मदत करा, मदत नाही केली तर तुमच्या मुलाला जसे मारले तसे तुमच्या कुटुंबाला करण रोकडे व त्याचे मित्र गोळया झाडुन संपवुन टाकतील, आपआपसात मिटवुन घ्या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील.” अशी धमकी दिली. तेव्हा फिर्यादी यांनी त्यांना सांगितले कि, “मारायच्या आधी आला असता तर मिटवुन घेतले असते. माझ्या मुलाचा मर्डर केला आहे. मला न्याय पाहिजे.” त्यावर आरोपी हिने फिर्यादी यांना धमकी दिली, “तुमच्या सर्व कुटुंबाची माहीती करण रोकडे व त्याच्या मित्रांना आहे, आपआपसात मिटवून घ्या, नाहीतर कधीही हमला होवु शकतो. ” अशी धमकी देवून त्या निघुन गेल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार (दि.११) रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घरामध्ये घडला. महिला फिर्यादीने आरोपी महिला आरोपी, महिला आरोपी, विधीसंघर्षित बालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून दोघा आरोपींना अटक केली आहे.