न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- एकता हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या आरोपीने फिर्यादी यांची रिक्षा व त्यांच्या मुलाच्या दुचाकी पॅशन प्रो गाडीला आग लावुन आगळीक केली.
हा प्रकार (दि. १२) रोजी पहाटे २.०० ते ३.०० च्या सुमारास फिर्यादीच्या घराबाहेर समता हौसिंग सोसायटी, बापुजी बुवानगर थेरगाव येथे घडला.
फिर्यादी विजय मनाजी देवकर यांनी आरोपी चेतन जालींदर लोंढे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी २६५ / २०२३ भा.द.वि. कलम ४३५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.