न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- मोबाईलवर हॉटेलला रेटिंग आणि टास्क पुर्ण करुन पैसे कमवण्याचे आमीष दाखवले. आरोपींनी फिर्यादीची एकुण १९,३२,८६१ रुपयांची फसवणुक केली.
ही घटना (दि. १ ते ९/६/२०२३) पर्यंत पुर्णानगर, चिंचवड येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी अकाऊंट धारक, टेलीग्राम आयडी धारक व लिंक धारक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिखली पोलिसांनी ३८८ / २०२३ भा.द.वि. कलम ४२० नुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.