- कंपनीत सुपरवायझरचा हेल्पर महिलेवर बलात्कार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- कंपनीमध्ये हेल्पर म्हणुन फिर्यादी या कामास आहेत. आरोपी हा कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणुन नोकरीस आहे. दरम्यान आरोपीने फिर्यादी महिलेसोबत जबरदस्तीने तीच्या इच्छेविरुध्य शारीरिक संबंध केले. त्यानंतर फिर्यादी यांना ‘तु माझे काहीही वाकडे करु शकत नाही’, असे म्हणुन धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २६/०५/२०२३) रोजी व्ही.एस. इंडस्ट्रीज, भारत पेट्रोल पंपाजवळ, फेज २, हिंजवडी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी सुर्यकांत गणपती रामनल्ली (वय ३४ वर्षे, रा. हिंजवडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात ७०२/२०२३ भादवि ३७६,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.