न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- कामावर फिर्यादी होते. त्यावेळी त्यांच्या राहत्या घरी फिर्यादीची पत्नी, आई व लहाण बहिण होते. त्यावेळी फिर्यादीची आरोपी पत्नी हिने रागाच्या भरात कशाचे तरी सहायाने त्यांच्या आठ महिण्याच्या मुलाचे नाक व तोंड दाबुन त्याला ठार मारले.
त्यानंतर घरातील कटरच्या सहायाने तिने तिच्या स्वतःच्या डाव्या हाताची नस कापुन बाथरुमध्ये आत जावुन आतुन कडी लावुन घेवुन स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि १३) रोजी सायं ०४.३० ते ५.३० च्या दरम्यान नेवाळे वस्ती, चिखली येथे घडली. फिर्यादी पतीने आरोपी पत्नीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चिखली पोलिसांनी ३९२/२०२३ भादवी कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.