न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- सेंटोसा वॉटर पार्क येथे ६ वर्षांच्या मुलीचा स्विमिंग पूलमध्ये पडून बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी घटनेचा छडा लावला आहे. तेथील यंत्रणेला जबाबदार ठरवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, मयत मुलगी, तिची आई व दोन भावांसोबत पिंकनिकसाठी आली होती. त्यावेळी ती वॉटर पार्कच्या परिसरात खेळत असताना आरोपी हॉटेल सेन्टोसा रिसॉर्टचे मालक व मॅनेजर यांनी निष्काळजीपणे परिसरात कोणत्याही प्रकारची सुरक्षतेची खबरदारी न घेतल्यामुळे व तेथे नेमण्यात आलेले लाईफगार्ड (सुरक्षा रक्षक) तेथे हजर नसल्यामुळे तसेच लहान मुलाच्या सुरक्षतेच्या दृष्टीने अंगात घालण्यासाठी लाईजाकेट नसल्याचे लहान मुलांचे सुरक्षा संदर्भात येथे काहीएक मार्गदर्शक सुचना फलक न लावल्यामुळे व ज्या ठिकाणी पाण्याची खोली जास्त आहे अशा स्विमिंग पुलाच्या कठडयाच्या बाजूस (पुर्णता) सुरक्षा रेलींग न लावल्यामुळे पाण्यात पडुन बुडुन मयत झाली.
ही घटना (दि. १२) रोजी दुपारी २.०० च्या दरम्यान रावेतमधील सेंटोसा वॉटर पार्क येथे घडली होती. रावेत पोलिसांनी २३४ / २०२३ भा.द.वि.स. कलम ३०४(अ), ३४ प्रमाणे अजय हरीलाल हिंदुजा (मॅनेजर), राहुल आबा मोरे सुपरवायझर, सागर भगवान काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.