न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- तीस वर्षीय पिडीत महिलेला तिघांनी पैशांचे आमीष दाखवू वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला. त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली. तसेच सह आरोपीने त्याचा फलॅट हा कोणताही भाडेकरारनामा न करता वेश्या व्यवसायासाठी उपलब्ध करून दिला, असे फिर्यादीत म्हटलं आहे.
ही कारवाई अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाच्या पोलिसांनी (दि. १३) रोजी सायं. ६.१० च्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे केली.
चिखली पोलीस ठाण्यात ३९० / २०२३ भा.दं.वि. कलम ३७० (२), ३४ अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे आरोपी रामेश्वर प्रभाकर मुळे, महिला आरोपी, तुषार जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे.