- ब्राऊन शुगर बाळगणारा इसम पोलिसांच्या जाळ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रोडवरील चौराईनगर, सोमाटणे दिशा दर्शक फलकासमोर आरोपीने स्वतःजवळ १,७०,००० रुपयांचे एकूण ३४ ग्रॅम वजनाचे ब्राऊन शुगर अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या विनापरवाना विक्रीकरीता जवळ बाळगले.
सदरचे ब्राउन शुगर हे त्याने मजिद बंदर, मुंबई येथुन भाई (पुर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्याकडुन विकत आणले असल्याचे आरोपीने तपासात सांगीतले. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी (दि. १४) रोजी २.१५ च्या सुमारास केली.
या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी १५९/२०२३ एन.डी.पी.एम. अॅक्ट कलम ८ (क). २१ (ब). २९ प्रमाणे आरोपी नरेश यल्लप्पा नक्का याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.
शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून आणि इतर गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून त्याला अटकाव करणे गरजेचे आहे, अशी मागणी तेथील ग्रामस्थ करीत आहेत.












