न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- सोसायटीत येऊन आरोपींनी दहशत निर्माण केली. दगड मारून गाडयांचे सुमारे सत्तर हजारांचे नुकसान केले. फिर्यादीच्या शर्टच्या खिशातील १,७०० रुपये बळजबरीने काढून घेतले. तसेच एकाच्या रिक्षाच्या गल्ल्यामध्ये सी.एन. जी भरण्यासाठी ठेवलेल्या पैशांची चोरी केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १४) रोजी रात्री १०.४५ वाजताच्या सुमारास विशाल चैतन्य हौसींग सोसायटी, मराठी शाळेशेजारी, कासारवाडी येथे घडला. फिर्यादी सुभाष बबन टोपे यांनी आरोपी अमित बाळासाहेब पिसाळ, कौशल बाळासाहेव पिसाळ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
भोसरी पोलिसांनी ५०४/२०२३ भादवी कलम ३९२, ३७९, ४२७,३४ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम:- ३७ (१) सह (१३५), क्रिमीनल लॉ अमेंडमेंट ३,७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.