न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- तोंड ओळखीच्या आणि एकाच परिसरात राहणाऱ्या आरोपीने काही दिवसांपुर्वी फिर्यादीकडून हात उसने पैसे घेतले होते. ते दिलेले पैसे आरोपीला परत मागितले. त्याच त्यांना राग आला. दोघांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहान केली.
दरम्यान भांडण सोडवुन फिर्यादीचा भाऊ हा फिर्यादीला घरी घेवुन जात असताना सह आरोपीने त्याच्या जवळ असलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात मारुन त्यांना जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १४) रोजी २.३० च्या सुमारास माऊली प्लोअर मिलसमोर, मोरवाडी, पिंपरी येथे घडली. फिर्यादी आशिष सुधाकर शिंदे यांनी आरोपी जमिर शेख, अस्लम शेख यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६४० / २०२३ भा.द.वि. कलम ३२४,३२३, ५०४, ५०६, ३४, आर्म अॅक्ट ४ (२५), महा.पो. अधि. अंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.