न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- फोनद्वारे इंडियन आर्मी ऑफिसर कर्नल यांची पत्नी असल्याचे भासवून फिर्यादीला गुगल पे अॅप ओपन करण्यास सांगितले.
बँक ट्रान्सफर ऑप्शन वर क्लिक करण्यास भाग पाडून एंटर रिसीपिइन्ट डिटेल्समध्ये आरोपीने फिर्यादीस डिटेल्स भरण्यास सांगितले. रिसीपिइन्ट म्हणुन फिर्यादीस त्यांचे नाव टाकण्यास सांगुन एकुण ७५,००० रुपयांची आर्थिक फसवणूक केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार( दि. १४/०५/२०२३) रोजी फिर्यादीच्या राहत्या घरी बावधन येथे घडला. फिर्यादी सतिश एकनाथ कोल्हे यांनी अज्ञात महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिसांनी ७१५/२०२३ भादवि कलम ४२०, ४०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.