न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जून २०२३) :- कंपनीमध्ये काम करीत असताना आरोपीने फिर्यादीच्या व्यवसाय संदर्भातील गोपनिय माहितीचा अपहार केला. ही माहिती परस्पर स्वतःच्या मेल आय. डी. वर पाठवुन त्या माहितीचा वापर/उपयोग स्वतःच्या आर्थिक फायदयाकरीता स्थापन केलेल्या फाईन्टेक रोबोटीक आटोमेशन्स अॅन्ड सोलशन्स या कंपनीसाठी केला.
त्यांच्या कंपनीद्वारे फिर्यादीच्या कंपनीची गोपनिय माहिती फिर्यादीची कंपनीची प्रतिस्पर्धी कंपनी स्टील स्ट्रीप्स व्हिल्स लि.चेन्नई यांना विक्री केली. त्यामुळे फिर्यादीच्या कंपनीचे साधारण तीस करोड रुपयांचे नुकसान झाले आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार सन १९९६ पासुन आजपर्यंत आरोपीच्या कर्तव्य काळात कुरुळीतील कल्याणी मॅक्सिवॉन व्हिल्स प्रा. लि. कंपनीमध्ये घडला. फिर्यादी नरेंद्र अर्जुनराव पाटील आरोपी सचिन छबीनदास सुरवडे, अरुण हनुमंत चिखले, संजीव अन्नप्पा निंगनुरे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३३२ / २०२३. भा.द.वि. कलम ४०६, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम क – ४३, ६६ अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.