- त्यानंतर सासुरवाडीत जाऊन पत्नीसह सासू सासऱ्यांशी उद्धट वर्तवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- घरात दारु पित असताना आरोपी पती फिर्यादी पत्नीला ‘मला भुक लागली आहे. मला आमलेट करुन घेऊन ये’, असे म्हणाला. फिर्यादी आमलेट करायला गेल्या तेव्हा फिर्यादीच्या पतीची आई रूममध्ये गेली. तीने मुलाला दारु पिताना बघीतले. आरोपी पतीच्या आईला फिर्यादी यांनीच त्यांच्या रूममध्ये पाठविले आहे, असा आरोपीचा समज झाला. त्यामुळे आरोपी पतीने फिर्यादी पत्नीला कमरेचा पटटा काढून मारले होते. त्यामुळे फिर्यादी या वडिलांच्या घरी निघून गेल्या.
त्यानंतर आरोपी पती हा फिर्यादी पत्नीच्या वडीलांच्या घरी आला. त्यांना चल माझ्यासोबत असे म्हणाला. फिर्यादी पत्नीने आरोपी पतीच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी पतीने फिर्यादी पत्नीला धक्का देत त्यांच्या कानाखाली मारली. फिर्यादी यांचे वडील मध्ये आले असता त्यांना सुध्दा त्याने मारहाण केली. फिर्यादीच्या आईला सुध्दा आरोपीने धक्का मारला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. १) रात्री १.३० च्या सुमारास रहाटणी येथे व (दि. १३) रोजी रात्री १.३० वाजता नढेनगर, काळेवाडी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी पती असद इसराक खान याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपीवर ५७६ / २०२३ भा.द.वि. कलम ३२४, ३२३, ५०४ नुसार गुन्हा दाखल करीत त्याला सीआरपीसी कलम ४१ (१) (अ) अन्वये नोटीस दिली आहे.