न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जून २०२३) :- सफेद रंगाच्या मर्सिडीज कारवरील चालकाने वाहन हलगर्जीपणाने भरधाव वेगात चालवून रस्ता ओलांडणा-या फिर्यादीच्या ६९ वर्षीय आई व ४३ वर्षीय मावस बहीण यांना जोराची धडक दिली.
अपघातात त्या दोघींही गंभिर जखमी झाल्या होत्या. उपचारा दरम्यान त्या मयत झाल्या आहेत. हा अपघात (दि. १५) रोजी सायंकाळी ६:४५ च्या सुमारास दापोडी बस स्टॉप, जुना मुंबई-पुणे हायवेवर झाला.
फिर्यादी महिलेने आरोपी मर्सिडीज कार चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ५०७/२०२३ भादंवि कलम ३०४(अ), २७९,३३८ मो.वा का कलम १८४, ११९/१७७ नुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.