न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- महिला गरोदर असताना तिला तिच्या नव-याला मारण्याची धमकी दिली. आरोपीने तिला हाताने मारहान करुन तिच्यासोबत वारंवार बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार फेब्रुवारी २०२३ पासुन ते दि. २८/०४/२०२३ पर्यंत मोशी व शिरुर येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी अक्षय संजय कांबळे (रा. मोशी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २५६/२०२३ भा.द.वि. कलम ३७६ (२) (एच) (एन),३७७,५०६,३२३ अन्वये गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.