न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० जून २०२३) :- उद्यानाच्या कामाचे बिल मंजूर करणे व त्याचा ऑडिट रिपोर्ट देण्यासाठी १७ लाख रुपयांची लाच स्वीकारताना महापालिका सहायक उद्यान निरीक्षक किरण मांजरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ जून रोजी अटक केली होती.
दरम्यान महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी त्यांना सेवेतून निलंबित केले असून त्यांची विभागीय चौकशी करण्यास मान्यता दिली आहे. सेवा निलंबन काळात तीन महिने अर्धवेतनी रजेइतके वेतन व उपजीविका भत्ता दिला जाणार आहे.
कोणत्याही ठिकाणी त्यांना नोकरी करता येणार नाही, त्याबाबतचा दाखला दर महिन्याच्या २० तारखेला प्रशासनाकडे सादर करावा, असा आदेश प्रशासक सिंह यांनी दिला आहे.

















