न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- व्हॉटस अॅप नंबरवरुन आरोपीने टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातुन वेगवेगळे प्रिपेड टास्क दिले. जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवुन वेगवेगळया बँकेच्या अकाऊंटवर आरोपीने फिर्यादीकडून एकुण ३९,१५,४१५ रुपये घेतले.
त्याचा अद्यापपर्यंत परतावा व मुद्दल परत न करता विश्वासघात करुन फिर्यादी यांची ऑनलाईन पध्दतीने आर्थीक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी साई संतोष व्यंकटरमना वुन्ना, (रा. पिंपळे सौदागर) यांनी आरोपी अनोळखी महिला एच. आर. मिना रमा (टेलिग्राम आय. डी.@Rama1709, टेलिग्राम गृप arm worldwide Mission Group) जबाबमध्ये नमुद बँक अकाऊंट धारकांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी २९६ / २०२३, भा.दं.वि. कलम ४०६,४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.















