न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- व्हॉटस अॅपवर मेसेज आला. त्यामध्ये मॅसेज पाठविणा-या व्यक्तीने आपले आणि कंपनीचा एच. आर. मॅनेजर असल्याचे सांगितले. बनावट टेलिग्राम अकाउंटवरुन, खोटी ओळख दर्शवुन, विश्वास संपादन करुन फिर्यादीची ६,६५,६५० रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे.
हा प्रकार (दि. ३१/ ०५/२०२३) रोजी दुपारी १२.१७ ते दिनांक ०३/०६/२०२३ च्या दरम्यान पिंपरीत घडली. फिर्यादी प्रतीक कौशल किशोर कन्सल यांनी आरोपी अनोळखी व्हॉटस अॅप मो.नं. ९१७४०२३४६२४२ मोबाईल धारक कु. मिरा रोबीनाच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६७१ / २०२३ भा.द.वि कलम ४२०, ४०६ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.















