- तरुणांची लाखोंची फसवणूक; पाच जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- कंपनीमध्ये फिर्यादीसह त्यांच्या बरोबरच्या इतर साथिदारांना आरोपीच्या ई पेवेलिन कंपनी, खराडी, पुणे व बेंक्यू सॉफ्टवेअर सिस्टम्स प्राव्हेट लिमिटेड, विमाननगर येथे नोकरीला लावण्याचे आमिष दाखवले.
त्यासाठी फिर्यादीकडून १,६८,००० रुपये व १५ इतर सहकाऱ्यांचे २२,५८,००० रुपये असे एकुण २४,२६,००० रुपये फोन पे, गुगल पे व चेक व्दारे वेळोवेळी स्विकारले. अस्तित्व नसलेल्या बनावट कंपनीचे बनावट नेमणुक पत्र (अपॉइंटमेंट लेटर) देवुन त्यांची आर्थिक फसवणुक व विश्वासघात केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. १२/०८/२०२२ ते १८/०६/२०२२ दरम्यान) टेक्नालॉजी एस.ए.पी.एम एम कंपनी व एम के मॅनेजमेंट सर्व्हिस कंपनी, जय गणेश सम्राज्य, जी विंग, शॉप नंबर- ६४, शरद बँक जवळ, स्पाईन रोड, भोसरी येथे घडली.
फिर्यादी कमलेश पंढरीनाथ गंगावने यांनी आरोपी महेशकुमार कोळी, महीला आरोपी, सुरज महाले, श्रावण शिंदे, अनुदिप शर्मा पशुपती यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ५३६/२३ भा.दं.वि.क. ४१९, ४२०,४०६, ४६५, ४६७, ४६८, ४७१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















