न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- वाकड येथील फ्लॅटची विक्री शेठ अॅण्ड पोपट इंटरप्रायझेसचे भागीदार आरोपी मॅनेजर आणि सह आरोपी यांनी फिर्यादीला १,१८,०८,००० रुपये किमतीत करून देण्याचे ठरवले होते. दरम्यान आरोपींनी आपापसात संगणमत करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीकडुन फ्लॅटसाठी वेळोवेळी आरटीजीएसने ३४,०४, २०० रुपये व रोख स्वरुपात १६,५०,००० रुपये असे एकुण ५०,५४,२०० रुपये स्वीकारले. मात्र, फ्लॅटची फिर्यादी यांना विक्री केली नाही.
तसेच फिर्यादीकडुन फ्लॅटच्या बदल्यात स्वीकारलेले पैसे त्यांना परत न देता कट कारस्थान रचुन फिर्यादी यांचा विश्वासघात करून सदरचा फ्लॅट इतरांना बेकायदेशीर खरेदीदस्त तयार करुन देत त्याची विक्री करुन फिर्यादी यांची अर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. ३०/०३/२०२२ ते दि. २६/०६/२०२३ पर्यत) फ्लॅट नंबर १२०१, टियारा सोसायटी, वाकड येथे घडली. फिर्यादी अजिंक्य रविंद्र ओझा यांनी आरोपी रुपेश छोटालाल शेठ, उतीन चौहान, यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी दोघांवर ६०५/२०२३, भा.द.वि. कलम ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















