न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जून २०२३) :- स्वरा म्युझीकल्स, स्वच्छंद व एस के बॅनर्स प्रस्तुत “सुहाना सफर” या लोकप्रिय हिंदी मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता. एकाहून एक सरस गाण्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले गेले. या कार्यक्रमात पुण्यातील प्रसिद्ध कलाकार हिम्मतकुमार पंडया, रविद्र शाळु व प्रज्ञा गौरकर व पिंपरी चिंचवड मधील संजय खटावकर व शोभा कदम यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन, स्वरा स्टुडीयो, निगडी, यांनी केले होते. कार्यक्रमांचे उत्कृष्ठ सुचसंचालन मनीष गोखले यांनी त्यांचे विविध शैलीने केले.
या कार्यक्रमाचे विशेष निमंत्रक नगरसेवक अमित गावडे होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनाने झाली. पहला नशा पहला खुमार, तु मेरे सामने, तु शायर है, भोले ओ भोले तेरे बीना जिंदगी से कोई अशी अनेक गाणी सादर केली. त्यापैकी दुनिया मे लोगो को, राजा ललकारी, शौकीयो मे घोला जाये, परदेशीया, अश्विनी ये ना, हाल कैसा ये जनाब का दिन सारा गुजारा तोरे अंगणा, हमको तुमसे हो गया, दिल चिज क्या हैं, आल्या आल्या जावु नका, बडे है दिल के काले अशा अनेक गीतांना विशेष पसंती दर्शवली व प्रेक्षकानी मनमुराद आनंद लुटला.
या कार्यक्रमात निगडी प्राधिकरण विभागातील प्रेक्षकांनी उत्तमरित्या सहभाग नोंदविला. तसेच कलाकारांना उत्कृष्ठरित्या प्रतिसाद दिला. सहभागी कलाकारांनी उत्कृष्ट गाणी सादर केली, असे मत मान्यवरांनी नोंदविले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महापौर राजू मिसाळ, अपर्णा बिसाळ, प्रदेश सचिव भाजपा अमित गोरखे तसेच अतुल परदेशी, संगीता तरडे, अतुल इनामदार, सीमा अनुराज कोहीनकर, डॉ. अविनाश देशपांडे व सर्व आनंदयात्रीकर, राम भिडे, डॉ. संजीव तांदळे, राहुल गौरकर, तसेच ओझर गणपतीचे माजी सरपंच असे सर्वच स्तरातील मान्यवर आनंद यात्रीकर उपस्थित होते. हा कार्यक्रम संपुर्ण तांत्रिक टिम हेमंत उतेकर, बिक्रम क्रिएशन, संजय वाघचौरे, नंदकुमार कातळे, पुष्कर देसले, प्रथमेश कदम यांच्या सहकार्याने पार पडला.















