न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- पायी जाताना फिर्यादीला मित्र भेटला. त्यावेळी फिर्यादीकडे त्याने सज्जाद शेख याचा मोबाईल नंबर मागितला. त्यावेळी आरोपी हा फिर्यादी जवळ आला व याला नंबर देवु नको, असे म्हणाला. त्याने फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.
फिर्यादीला रस्त्यावर ढकलले. त्यावेळी बर्ड व्हॅली बाजुकडुन आकुर्डी बाजुकडे रस्त्याने पांढ-या रंगाची फॉर्च्यूनर कार चालली होती. त्या कारच्या टायरखाली फिर्यादी यांचा उजवा पाय जावुन फिर्यादीच्या उजव्या पायाला पोटरीपासुन खाली तळव्यापर्यत जबर दुखापत झाली. फिर्यादी यांचा पाय फॉर्च्यूनर गाडीच्या टायरखाली असताना देखील आरोपीने फिर्यादीला हाताने मारहाण केली.
ही घटना (दि. २६) रोजी ६.३० वाजता विदयानगर बस स्टॉप जवळ, विदयानगर, चिंचवड येथे घडली. फिर्यादी प्रशांत अनिल सोनवणे यांनी आरोपी सद्दाम शेखच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ६७४ / २०२३ भादवि कलम ३३७,३३८, ३२३,५०४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.












